मुंबई महापालिकेच्या वृक्ष संवर्धनाची मलेशियाला भुरळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते, पूल यासारख्या मूलभूत-पायाभूत सुविधा पुरवणारी महापालिका पर्यावरणआणि वृक्ष संवर्धनातही आघाडीवर असून झाडांचे बुरशीपासून संरक्षण आणि संवर्धनासाठी गेरू आणि चुन्याच्या लेपनाच्या शास्त्र्ााrय पद्धतीचा वापर करते. महापालिकेच्या या पद्धतीचा उपयोग आता मलेशियाही करणार असून त्यासाठी मलेशियाच्या मुंबईतील वाणीज्यदूतांनी पालिका उद्यानप्रमुखांकडून शास्त्र्ााrय पद्धत समजून घेतली.

मलेशियातील केदाह राज्याचे राजे सुलतान सालेहऊदिन इबनी अलमरहुम सुलतान बद्लीशाह हे काही दिवसांसाठी मुंबई भेटीला आले होते. त्यावेळी त्यांना मुंबईतील सार्वजनिक परिसरातील वृक्षांच्या खोडांना तांबडय़ा व पांढऱया रंगाचे वैशिष्टपूर्ण लेपन दिल्याचे आढळले. ते मलेशियात परत गेल्यानंतर मलेशियाच्या वाणिज्यदूतांना यामागील कारणांची माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत जैनल अजलान मोहम्मद नादजिर यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथील महापालिकेच्या उद्यान विभागाला भेट देऊन झाडांना रंग देण्याची कारणे, पद्धती व प्रक्रिया जाणून घेतली. तसेच मुंबईच्या धर्तीवर मलेशियातील झाडांना देखील गेरु व चुन्याचे लेपन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परेदशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी नादजिर यांना याबाबत माहिती दिली. नादजिर यांनी उद्यान विभागाच्या कामांचे काwतुक केले तसेच त्यांनी मलेशियातील उद्यानांची माहिती देणारे एक पुस्तक उद्यान विभागाला भेट दिले तर उद्यान विभागाद्वारे ‘फायकस’ या प्रकारातील बोनसाय झाड नादजिर यांना भेट दिले.

पालिका करते 700 उद्यानांसह लाखो वृक्षांचे संरक्षण, संवर्धन

मुंबईतील तब्बल 700 उद्यानांसह लाखो वृक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी मुंबई महापालिका यशस्वीपणे पार पाडत आहे. सार्वजनिक परिसरातील वृक्षांच्या संरक्षणासाठी खोडांना तांबडय़ा व पांढऱया रंगाचे म्हणजे गेरू आणि चुन्याचे वैशिष्टपूर्ण लेपन केले जाते. गेरुमध्ये अम्लीय गुणधर्म असतात तर चुन्यामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात. गेरु व चुन्याच्या लेपनामुळे झाडांचे बुरशी, वाळवी, खोडकिडयापासून संरक्षण होते. त्याचबरोबर दृश्यमानता वाढून संभाव्य अपघातांचे प्रमाण कमी होते,शहराच्या सौंदर्यातही भर पडते.ही झाडे सार्वजनिक संस्थेच्या मालकीची असल्याचेही यातून अधोरेखित होते. महापालिकेच्या या वृक्ष संरक्षण आणि संवर्धनाबद्दल सर्वसामान्यांपासून तेदेशीपरदेशी पर्यटक, राजकीय नेते, उच्चायुक्त यांच्यात पुतूहल पाहायला मिळत आहे.