इंटरनेटवर पॉर्न साईट शोधाल तर पोलिसांना मेसेज जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटवरील अश्लील मजकुरावर निर्बंध लादण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाय योजण्यात आले आहेत. अनेक अश्लील वेबसाईट्सवर बंदीही घालण्यात आली आहे. पण, आता पोलिसांनी थेट इंटरनेटवर अश्लील साईट्स शोधणाऱ्यांकडेच आपला मोर्चा वळवला आहे.

आता इंटरनेटवर पॉर्न साईट शोधण्याचा प्रयत्न केल्यास थेट पोलिसांनाच याची माहिती मिळणार आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी पोलिसांनी ही योजना ठरवली आहे. पण, ही योजना उत्तर प्रदेशात सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशातील महिलांविरोध गुन्ह्यांचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी पोलीस आता अश्लील वेबसाईट शोधणाऱ्यावर नजर ठेवणार आहेत.

यासाठी oomuph नावाची एक कंपनी वापरण्यात येणाऱ्या डेटाची चाचणी करणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून किती आणि कोणते सर्च केले जातात, हे ही कंपनी सांगणार आहे. जर कुणी इंटरनेटवर अश्लील वेबसाईट शोधत असेल तर ताबडतोब कळणार आहे. मग हे पथक पोलिसांच्या 1090 युनिटला ही माहिती देईल. मग त्यानंतर पोलीस त्याला अशा वेबसाईट शोधण्यापासून रोखणार आहेत.

ही योजना उत्तर प्रदेशमध्ये टप्प्याटप्प्यात कार्यान्वित होणार आहे. सगळ्या स्तरातील इंटरनेट युजरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत. तसंच याविषयी सोशल मीडियातूनही जनजागृती करण्यात येणार आहे.