कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या समस्यांबाबत नगरपंचायत विरोधी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले आहे. त्यानंतर कणकवली शहरातील कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना खासदार विनायक राऊत यांनी ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत.
कणकवली शहरातील हायवेच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने शहरातील बस स्टॅन्डसमोरील प्रवेश मार्गावरील मिडल कट तसेच महामार्गाचे काम करत असताना कणकवली नगरपंचायतच्या महामार्गाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते. हे रस्ते महामार्गाच्या सर्विस रोडला जोडतात अशा रस्त्यांचे किमान 15 मीटरपर्यंत डांबरीकरण, तसेच जानवली पुलाच्या पुढे कणकवली कडे येणारा रस्ता अरुंद झाला असल्याने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली. या मागणीच्या अनुषंगाने राऊत यांनी ठेकेदार कंपनीला तातडीने सूचना देत कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.



























































