
बीड जिल्ह्यातील रेणापूर येथील बाजारामध्ये मोबाईलची चोरी करुन पळून जाणाNया बीड येथील युवकास पाठलाग करुन नागरीकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणापूर पोलीस ठाण्यात ओंकार चंद्रकांत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादी आणि त्यांचा मित्र हे रेणापूर बाजारात खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी फिर्यादीच्या खिशातील मोबाईलची चोरी करुन एक युवक पळून जाऊ लागला. त्याला पाठलाग करुन पकडण्यात आले आणि पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले. अनिल मोहन गुंजाळ वय २२ रा. नागोबा गल्ली बीड असे त्याचे नाव असल्याचे त्याने सांगीतले. त्याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

























































