
सोशल मीडियावर प्राणीपक्ष्यांचे फोटो आणि व्हिडियो शेअर होत असतात. ते बघायला लोकांना खूप आवडतात. मात्र कधी असे फोटो दिसतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. अशाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो आहे सफेद हरणाचा. हे सफेद हरीण नेटिजन्सला खूप आवडलंय. मात्र त्याचवेळी काहींच्या मनात शंका निर्माण झालेय की हरणाचा रंग बदलला कसा!
सफेद हरणाचा फोटो इंडियन वाईल्डलाईफच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोला कॅप्शन देताना हरणाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. खरं तर हे काळं हरिण आहे. मात्र प्राण्यांच्या त्वचेमध्ये मेलनिनची कमी असली की त्यांचा रंग पूर्ण सफेद दिसतो. वन्यजीव तज्ञांचे म्हणणे आहे की या आजारामुळे प्राण्यांचा रंग बदलतो. त्यामुळे असे प्राणी भक्षक किंवा शिकाऱयांचे सहज लक्ष्य ठरतात.
इन्स्टाग्रामवरील सफेद हरणाचा फोटो अनेकांना आवडतोय. काहींना हा निसर्गाचा चमत्कार वाटतोय तर अनेकांनी फोटोवर अविश्वसनीय अशी कमेंट केली आहे.























































