लॉकडाऊननंतर प्रथमच नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊननंतर प्रथमच वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी रसिकांसाठी खुली होत आहे. प्रख्यात चित्रकार गोपाल खेतांची यांच्या ‘साज श्रृंगार’ हे वास्तववादी चित्रांचे प्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गँलरीत भरविण्यात आले आहे. प्रदर्शन येत्या 16 ते 22 फेबुवारी या काळात सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिकांना बघता येईल. गोपाल खेतांची राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत. ‘साज श्रृंगार’ मध्ये खेतांची यांनी हिंदुस्थानी स्त्राr सौंदर्याचा पारंपारिक साज व श्रृंगार, अभिजात सौंदर्याचे वास्तववादी रूप रेखाटले आहे.