कोणतेही कारण न देता ‘नजरकैद’ ही लोकशाहीची पायमल्लीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 जम्मू-कश्मीरातील 370 कलम हटवल्यापासूनच मला आणि माझ्या सर्व कुटुंबाला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घरातच नजरकैद करून ठेवले आहे. मीच नव्हे तर माझे खासदार वडील फारुख अब्दुल्ला यांच्यावरही सरकारी गुप्तचर आणि पोलिसांची सतत करडी नजर असते. आम्हाला नजरकैद केलेत, पण माझ्या बहिणीलाही मुलांसह घरात कैद करून ठेवणे हा कुठला न्याय, अशी व्यथा मांडणारा सवाल जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. ऑगस्ट 2019 नंतर आम्हाला नजरकैदेत ठेवत कोणतेही कारण त्यासाठी न देणाऱ्या केंद्राला हेच ‘नवे जम्मू-कश्मीर’ वाटत असेल तर ती लोकशाहीची पायमल्ली आणि क्रूर थट्टाच ठरेल, अशी संतप्त भावनाही ओमर यांनी व्यक्त केली. ओमर यांनी आपल्या घराबाहेरील कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे छायाचित्रही पत्रकारांना दाखवत आपल्या भावना व्यक्त केल्या.