अमित शहा म्हणाले, नेपाळ, श्रीलंकेतही भाजपची सत्ता येणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपची सत्ता नेपाळ आणि श्रीलंकेतही येईल, असे अमित शहा म्हणाले होते. अर्थात शहा यांचे हे म्हणणे कुणा ऐऱ्या गैऱ्या कार्यकर्त्याने नव्हे तर त्रिपुराचे मुख्यमंत्री बिल्पबकुमार देब यांनी जनतेसमोर आणले आहे.

त्रिपुरातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देब यांनी अमित शहा भाजपाध्यक्ष असताना काय म्हणाले होते हे सांगितले. देब म्हणाले, अमित शहा यांनी अध्यक्ष असताना आगरतळा येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक घेतली होती तेव्हा आम्ही त्यांना भाजप देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये सत्तेत आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्या वेळी अमित शहा म्हणाले, हिंदुस्थानात राज्य करणारच, पण अजून नेपाळ आणि श्रीलंका हे शेजारचे देश उरले आहेत. आपल्याला त्या दोन देशांतही सत्तेवर यायचे आहे हे लक्षात ठेवा, असे अमित शहा म्हणाल्याचे मुख्यमंत्री देब यांनी सांगितले.