अभिनेता संदीप नाहरची आत्महत्याच, पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहायक अभिनेता संदीप नाहरच्या मृत्यू मागे घातपात नसून त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गोरेगाव पोलिसांनी संदीपच्या नातेवाईकाचा जबाब नोंदवला आहे.

संदीपने सुशांत सिंह राजपूतच्या एम. एस. धोनी ए अनटोल्ड स्टोरी चित्रपटात सहायक अभिनेता म्हणून भूमिका केली होती. तो काही दिवसांपूर्वीच गोरेगावच्या शास्त्र्ााrनगर येथे भाडय़ाने राहण्यास आला होता. सोमवारी सायंकाळी संदीपने त्याच्या बेडरूममध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ संदीप रूमबाहेर न आल्याने त्याच्या पत्नीने दरवाजा ठोकला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याच्या पत्नीने ही बाब शेजारी राहणाऱयांना सांगितली. त्यानंतर सुताराच्या मदतीने संदीपच्या बेडरूमचा दरवाजा तोडला असता तो गळफास लावलेला दिसला. त्याच्या पत्नीने त्याला रुग्णालयात नेले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. त्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना अद्याप प्राप्त झालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतर काही बाबींचा उलगडा होणार आहे.

संदीपच्या आत्महत्येची माहिती समजताच आज त्याचे वडील आणि भाऊ मुंबईत आले. दरम्यान संदीपने आत्महत्ये पूर्वी फेसबुकवर एक स्क्रिप्ट लिहून एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या अनुषंगाने देखील गोरेगाव पोलीस तपास करत आहेत. रात्री उशिरा संदीपचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.