चंद्रपूर – सिनाळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील सिनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकवला आहे. सरपंच पदी सरिता बंडू नरुले तर उपसरपंच पदी सूरज आनंद शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सारिका मनोज कोडापे, आम्रपाली नेताजी रत्नपारखी, माधवी दिनेश कोपुलवार यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.

पंचवीस वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदाच सिनाळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व तालुका प्रमुख संतोष नरूले यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या या निवणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असी ही निवडणूक झाली. यामध्ये जनशक्तीचा विजय झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. पद ग्रहण करते वेळी शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, वसीम, राजु डोमकावडे,अभय गेडाम यांच्या सह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.