फेसबुकप्रमाणे व्हॉटस्ऍपही करता येणार ‘लॉगआऊट’! डीलिटचा पर्याय होणार गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअप सतत नवनवीन फिचर आणत असते. लवकरच व्हॉट्सअपवर एक भन्नाट फीचर येणार आहे. फेसबुकप्रमाणे आता व्हॉट्सअपवही लॉगआऊट करता येणार आहे. नव्या फीचरमुळे कधी ऑनलाईन यायचे आणि कधी ऑफलाईन जायचे हे आता युजर्सना ठरवता येईल.

सध्या व्हॉट्सअपमध्ये लॉग आऊटची सुविधा नसल्याने इंटरनेट सुरू असल्याने 24 तास मोबाईलमध्ये हे app सुरूच राहते. त्यामुळे मॅसेज आल्यानंतर वारंवार पह्नवर लक्ष जाते. फक्त इंटरनेट बंद केल्यानंतरच व्हॉट्सअपवर मॅसेज येत नाहीत. लवकरच व्हॉट्सअपवरील डिलीट अकाऊंटचा पर्याय हटवला जाणार असून व्हॉट्सअपच्या बीटा व्हर्जनमध्ये नवीन लॉग आऊट फीचरचा समावेश करण्यात येणार आहे.

सध्या हे फीचर व्हॉट्सअप मॅसेंजर आणि बिझनेस व्हर्जनमध्ये दिले जाणार आहे. अॅपल  आणि अँड्रॉईड या दोन्ही युजर्सना या फीचरचा वापर करता येईल.वेब बीटा इन्फोच्या माहितीनुसार, व्हॉट्सअप लवकरच मल्टी-डिव्हाइस फीचर लाँच करणार आहे. या वैशिष्टय़ाद्वारे वापरकर्ते चार वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये त्यांचे एक खाते वापरू शकतील. तथापि, डेटा संकलित करण्यासाठी वाय-फाय वापरणे आवश्यक आहे. सध्या या फिचरची चाचणी सुरू आहे. सध्या एकाच डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअप वापरले जात आहे. युजरला दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअप खाते सक्रिय करायचे असेल तर त्यांना दुसरा नंबर द्यावा लागतो. मल्टी-डिव्हाईस फिचरचा समावेश झाल्यानंतर युजर वेगवेगळ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअप वापरू शकतील.