
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2021) साठी चेन्नईमध्ये मिनी लिलाव सुरू आहे. आठ संघांमध्ये दमदार खेळाडू घेण्यासाठी चांगलीच चूरस लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेम मॅक्सवेल याच्यासाठी मोठी बोली लागली असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 14.25 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले आहे.
गेल्या वर्षी दुबईत झालेल्या आयपीएल सीझनमध्ये मॅक्सवेल फेल गेला होता. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला रिलीज केले. आज चेन्नईत मिनी लिलावादरम्यान त्याला आपल्या संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात चांगलीच चूरस लागली. 2 कोटी रुपयांची बेस प्राईज असलेल्या मॅक्सवेलसाठी दोन्ही संघ उत्सुक होती. मात्र अखेर आरसीबीने बाजू मारत मोठी रक्कम मोजून त्याला आपल्या संघात घेतले.
Base Price – INR 2 Crore
Sold for – INR 14.25 Crore@Gmaxi_32 heads to @RCBTweets after a fierce bidding war. @Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/XKpJrlG5Cc— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
आरसीबीकडून खेळण्याची व्यक्त केली होती इच्छा
लिलावाच्या आधी ग्लेन मॅक्सवेल याने आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना मॅक्सवेलने हे विधान केले होते. आरसीबीचा प्रमुख खेळाडू एबी डिव्हीलियर्स हा मॅक्सवेलचा आदर्श असून त्याचा खेळ पाहायला नेहमी आवडतो, असे तो म्हणाला. तसेच अशा प्रकारच्या खेळाडूसोबत खेळणे हा एक चांगला अनुभव असेल. त्याचा मला फायदा देखील होईल. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर मला नेहमीच छान वाटते, असेही मॅक्सवेल म्हणाला.
2020 मध्ये खराब कामगीरी
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फ्रँचायझीने हार्ड हीटर ग्लेन मॅक्सवेल याला 11 कोटींची मोठी रक्कम मोजून आपल्या गोटात समावेश केला. मात्र त्याला आपल्या संघासाठी पैसा वसूल कामगिरी करता आली नाही. स्पर्धेत त्याला एकही षटकार मारता आला नाही. त्यामुळे पंजाबच्या संघाने त्याला रिलीज केले होते.




























































