जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल – देशविदेशातील साहित्यिकांचा ‘व्हर्च्युअल’ मेळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्याचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर लिटरेचर फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. यंदा कोरोनामुळे महोत्सव क्हर्च्युअली  पार पडत आहे. त्यामध्ये 25 प्रादेशिक आणि 18 आंतरराष्ट्रीय भाषांचे 300 हून अधिक वक्ते आणि कलावंत सहभागी होणार आहेत. लिटरेचर फेस्टिवलचे यंदाचे 14 वे वर्ष आहे. याअंतर्गत हिंदी, मराठी, कोंकणी, संस्पृत, गुजराती, तमीळ, तेलगु, पंजाबी आदी प्रादेशिक भाषांचे वक्ते आपले विचार मांडतील.

प्रख्यात भाषातज्ञ नोम चोस्की, बुकर विजेता डगलस स्टुअर्ट, नोबेल पुरस्कार विजेता जोसेफ स्टिग्लिट्ज, मलाया युसूफजलाई   मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, प्रियांका चोप्रा सहभागी होणार आहेत.