
>> गायत्री जोशी
ऑनलाइन शिक्षण ही संकल्पना सहज व टेक्नोसॉव्ही वाटत असली तरी ती मुलांच्या शैक्षणिक व मानसिक विकासासाठी कितपत योग्य आहे हा नवा प्रश्न समस्त पालकवर्गाला सतावत आहे. यामुळे मुख्यतŠ मुलांचा शाळेच्या माध्यमातून होणार प्रत्यक्ष संवादच खुंटला आहे. ऑनलाइन शाळा, परीक्षा आणि त्यामुळे येणार मानसिक ताण हे मुलांसाठी आणि पालकांसाठी तितकेच महत्त्वाचे ठरले आहेत. शिक्षणाचा हा नवा पर्याय काहींसाठी समाधान तर काहींसाठी समस्या घेऊन आला आहे.
जवळपास गेले वर्षभर आपण ‘कोविड-19’ या वैश्विक साथीच्या आजाराशी झुंज देत आहोत. हा सामना करतानाच शालेय शिक्षणाबाबतच्या नव्या मुद्दय़ांना या काळात महत्त्व निर्माण झाले. ऑनलाइन शाळा, परीक्षा आणि त्यामुळे येणार मानसिक ताण हे मुलांसाठी आणि पालकांसाठी तितकेच महत्त्वाचे ठरले आहेत.
ऑनलाइन शाळा सुरू झाल्यानंतर साधारण एक महिनाभरात पालकांचे पह्न येऊ लागले. मुलांना ऑनलाइन काय शिकवताहेत ते समजत नाही, मुलं ऑनलाइन तासाला बसायला पंटाळा करतात, तासाला शिकवलेल्या गोष्टी वहीत लिहून घेत नाहीत इथपासून ते ऑनलाइन शाळा सुरू झाल्यापासून मुलं चिडचिड करतात किंवा शाळेत गेल्याशिवाय अभ्यास करणार नाही असा हट्ट करतात अशा अनेक समस्या घेऊन पालक या काळात संपर्प करत आहेत.
त्याचबरोबर अनेक पालकांनाही ऑनलाइन शाळेमुळे ताण येत असून त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारीसुद्धा काही पालकांच्या आहेत.
सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की, मुलांना ऑनलाइन शिकवलेलं का समजत नाही? साधारण पाच ते आठ वयोगटातील मुले चंचल असतात. त्यांना समवयस्कांबरोबर खेळणे, दंगा करणे जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळे शाळेत जाणे, शाळेच्या मैदानावर खेळणे, शिक्षकांशी बोलणे, त्यांना स्पर्श करणे या गोष्टींमुळे शाळेत जाण्याची ओढ या वयोगटाला असते. पह्न किंवा लॅपटॉपवर शिक्षक आणि वर्गमित्रांना बघणे ही कल्पना त्यांना समजत नाही. त्यातही जर मुलाला लार्ंनग डिसऑर्डर असेल तर अशावेळी शिक्षकांना प्रत्यक्ष बघून आणि त्यांच्याशी बोलून मूल जे शिपू शकते तसे ते ऑनलाइन शाळेत शिपू शकत नाही. मुलांना समोर काय चालू आहे याची पुसटशी कल्पना यायलाही बरेच दिवस जाऊ शकतात. असे घडल्यास साहजिकच ही मुले इतरांपेक्षा मागे पडतात आणि मुळातच अवघड वाटणाऱया अभ्यासाबद्दल त्यांना नावड निर्माण होते. मुलांच्या तासिकेच्या वेळेला जर आपण मुलांसोबत बसलात आणि शिक्षक काय शिकवत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या लक्षात येईल की, फळा न वापरता शिक्षक शिकवत असल्यास आपल्यालाही अनेक भाग समजत नाहीत. तसेच ऑनलाइन तासिकेत शंका विचारणे आणि उत्तर देणे हेही तांत्रिक अडचणींमुळे मुलांना जमत नाही. याचा मुलांना ताण येतो आणि मग ते तासिकेला बसायला टाळाटाळ करू लागतात. शिक्षक पालकांना सतत सांगतात की, मूल मागे पडते आहे, पण त्याचे नक्की कारण काय यावर विचार करण्याची गरज फारशी कोणाला वाटत नाही. मुलांनी अभ्यास करायलाच हवा असा दबाव पालक मुलांवर आणू लागले आहेत. मात्र याचा या मुलांच्या मानसिकतेवर अतिशय वाईट परिणाम होताना दिसतो आहे. चिडचिड, अतिसंवेदनशीलता, चिंताविपृती आणि भयगंड यांसारखे त्रास आतापासून मुलांना होताना दिसताहेत. अशावेळी आपल्या मुलाच्या शिक्षकांशी बोलून मुलाला स्वतः शिकवून फक्त परीक्षा देता येईल का याचा विचार करावा. तसेच शक्य असल्यास मुलांसोबत तासिकेला जरूर बसावे. नऊ ते पंधरा या वयोगटाच्या ऑनलाइन शाळेच्या समस्या वेगळ्या आहेत. मुळात नको असलेली सुट्टी आणि सतत घरात राहणे यामुळे ही मुले आधीच चिडचिडी झालेली आहेत. आता अचानक त्यांच्याकडून घरात मदत करण्याची अपेक्षाही ठेवली जाते. अशावेळी काही मुले आवडीने काम करत असतील, तरीही बहुतांश मुलांना घरगुती कामांचा पंटाळा येताना दिसतो. त्यामुळे आधीच बिघडलेले घरातील वातावरण ऑनलाइन शाळेमुळे अजून अवघड होताना दिसते.
या वयातील मुलांना समवयस्कांसोबत गप्पा मारणे, मनातील गोष्टी शेअर करणे, फिरणे आणि मैदानी खेळ खेळण्याची गरज असते. त्याच कारणांमुळे त्यांना शाळेत जाणे आवडते. वरील सर्व आनंददायी गोष्टी कधी करता येतील याची कल्पना नाही, परंतु अभ्यास मात्र सुरू झाला आहे. त्यातच आता परीक्षांचे वारे वाहू लागले आहेत या गोष्टीचा राग या मुलांना येतो आहे. अशावेळी इंटरनेट नाही किंवा पह्न-लॅपटॉप बंद आहे अशी कारणे देत परीक्षेला न बसणे असे प्रकार ही मुले करताना दिसतात. मुळात जिथे शिकवलेले काही समजलं नसेल तर मुलं परीक्षेला बसून काय उपयोग आहे? आधीच कातावलेली, घाबरलेली मुलं परीक्षेत जर अपयशी ठरली तर त्यांना आपण आपल्या हाताने डिप्रेशनकडे ढकलणार आहोत हे नक्की!
वैकासिक मानसशास्त्र्ााची अभ्यासक म्हणून मी इतपं नक्कीच म्हणू शकते की, शिक्षण मंत्रालय, शाळा आणि पालक यांनी ऑनलाइन शाळेचा निर्णय जरी घेतला असेल तरीही परीक्षांची सक्ती मुलांवर करू नये.
(लेखिका समुपदेशक आहेत)
– [email protected]



























































