
- 10 दिवसातील परिस्थिती पाहून लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार
- लॉकडाऊन हवा असेल तर मास्क घालू नका, लॉकडाऊन लागू करा
- लॉकडाऊन टाळण्यासाठी कोरोना रोखण्याच्या त्रिसूत्रीचा वापर करा.
- येत्या काळात तुमच्या वागण्यातून या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
- लॉकडाऊन नको असेल तर मास्क लावा, नियम पाळा
- ‘मी जबाबदार’ या नव्या मोहिमेला सुरुवात करायची आहे.
- गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा विचार करा
- गर्दी करणाऱ्या आंदोलनांवरही बंदी
- नियम पाळले नाहीत तर लॉक़डाऊन पुन्हा कडक करावा लागेल
- उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, आंदोलन, यात्रा यांना राज्यात काही दिवसांसाठी बंदी
- कार्यक्रमाला जास्त गर्दी करू नका, मास्क घाला.
- ही बंधने असतानाही विकासकामे सुरूच होते. आता तेथेही बंधने येणार आहेत.
- अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये उद्या संध्याकाळ पासून बंधने लागू होणार
- ही परिस्थिती बघता काही अटी आणि बंधने घालणे गरजेचे आहे.
- दुसरी लाट दरवाज्यावर धक्का मारतेय
- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय,सध्या राज्यात 53 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत
- मंत्रीमंडळातील माझे सहकारीही बाधित होत आहेत
- आता फैलाव वाढल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
- अमरावती सध्या कोरोनाचा कहर आहे. ही परिस्थिती वाईट आहे.
- कोरोनाच्या वाढत्या काळात जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आज आहे. ही चिंतेची बाब आहे.
- आपण योद्धे होत नसलो तरी कोव्हिडदूत बनू नका, सामाजिक भान ठेवा
- त्यांच्या मेहनतीवर आता आपण पाणी फिरवायचंं नाही.
- योद्ध्यांनी अहोरात्र मेहनत केली,. स्वत:चे जीव गमावले. ते शहीद झाले
- राज्यात काही दिवसांपूर्वी २ हजार रुग्ण सापडत होते. चांगलं वातावरण होतं. ही आपल्या कोव्हिड योद्ध्यांची मेहनत होती
- आज आपल्य़ा राज्यात ६९७१ रुग्ण आढळले
- अर्थचक्राला गती देत असताना पुन्हा कोरोनाने डोकं काढलं
- सध्या लॉकडाऊन फक्त कागदावर उरलेला आहे
- हॉटेल्स, हॉल्स, थिएटरमध्ये आपण नियमावली कडक केली आहे. इथे नियम मोडले तर मालकावरती कारवाई करणारच
- विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे
- नियमावली मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
- कोरोना रोखण्यासाठी नियमावली अधिक कडक केली आहे.
- बंधने, क्वॉरंटाईन कोणालाही आवडत नाही, मात्र, साथ रोखण्यासाठी हे गरजेचे आहे
- 100 वर्षांपूर्वी सॅनिश फ्लू रोखण्यासाठीही हेच तंत्र वापरण्यात आले होते.
- कोरोना रोखायचा असेल तर संपर्क टाळणे हाच यावर प्रभावी उपाय आहे.
- आपल्य़ाला वाटलं कोरोना गेला त्यामुळे लोकांनी मास्क घालत नव्हते
- जी शिस्त कोरोनाने आपल्याला लावलेली आहे ती शिस्त गरजेची आहे
- ही दुसरी लाट आहे की नाही हे येत्या 15 दिवसात कळेल
- पुन्हा आता कोरोना डोकं वर काढतोय. मधल्या काळात आपण शिथील झालो. फिरायला लागलो
- आपण कोरोनाची ती भयंकर परिस्थिती अनुभवली होती. अॅम्ब्युलन्स नाही, बेड्स नव्हते, ऑक्सिजन व्हेंटिलेटन नव्हते. टीव्ही लावला की सतत याच बातम्या होत्या
- मंदिरे, लोकल सेवा सुरू केल्या. मात्र, शिस्त पाळणे गरजेचे आहे.
- आता राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढतोय.
- या संकटाशी लढत महाराष्ट्र उभआ राहिला आहे
- कोरोना संकटात औषधे, रुग्णवाहिका, तपासणी केंद्रे, बेड यांची कमतरता होती, ही सुरुवातीची परिस्थिती होती.
- आपल्याकडे ढाल आहे. ती ढाल म्हणजे मास्क. मास्क घालणं अनिवार्य आहे.
- आतापर्यंत तलवार म्हणजे औषध हाती आलेले नाही. लसही धीम्या गतीने मिळत आहे.
- युद्धात ढाल तलवारीची गरज असते.
- कोरोनाशी जागतिक युद्ध सुरू आहे.
- शिवरायांना वंदन करणे हे महत्त्वाचे आणि भाग्याचे काम
- येत्या दोन महिन्य़ात आपल्याला आणखी काही कंपन्या लस देणार आहे. तेव्हा आपण सामान्यांना लस देणार आहोत.
- येत्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होतील
- राहिलेल्या कोव्हिड योद्ध्यांना मी विनंती करतो की मनात किंतू परंतू न ठेवता बेध़डकपणे लस घ्या
- 9 लाख कोव्हिड योद्धांना लस दिलेली आहे.
- काय करावं, कसं करावं कुणालाही कळत नव्हते.
- लॉकडाऊनचे दिवस भयंकर होते.
- औषध तेव्हाही नव्हते, आताही नाही. मात्र लस आल्याने दिलासा मिळाला आहे.
- जनतेच्या सहकार्याने आपण ही कोरोनाविरोधातील लढाई लढत आहोत.
- कोरोना संकटाच्या काळात आपण जनतेशी संवाद साधत होतो
- बंधन कोणालाही आवडत नाहीत, या सर्व संकटाला आता वर्ष होत आले आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात





























































