
राजस्थानातून जिलेबी विक्री व्यवसायासाठी पुण्यात येउन दुचाकींची चोरी करणाऱ्या तिघाजणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 62 हजारांच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
खियाराम लालाराम मेघवाल (वय.23), चुनाराम लालाराम मेघवाल (वय.21, रा.होलपूर ता.बिलाडा, राजस्थान) आणि दिलखुश कुभाराम ठिंगला (वय.19,रा.बिरावास, ता.बिलाडा,राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चंदननगर वडगांव शेरी परिसरात दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यापार्श्वभूमीवर तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव तुषार भिवरकर ,अमित कांबळे सुभाष आव्हाड आणि राहुल इंगळे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दुचाकी वाहन चोरी करणारे तीन चोरटे वडगांव शेरी कडे जाणार असल्याची माहिती तुषार भिवरकर यांना मिळाली. त्यामुळे पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना पाठलाग करून ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तिन्ही आरोपींनी चंदननगर आणि हडपसरमधून 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव,पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पंडीत गावडे, मोहन वाळके, युसूफ पठाण, रोहिदास लवांडे, श्रीकांत गांगुर्डे, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, अविनाश संकपाळ, अमित कांबळे, राहूल इंगळे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर, अमित जाधव, सुभाष आव्हाड, सचिन कोळी, परशुराम शिरसाट यांच्या पथकाने केली.




























































