
कोरोनाच्या उद्रेकाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण टाळेबंदीची घोषणा झाली. दरम्यानच्या काळात देशात सुमारे 70 टक्के कर्करुग्णांना जीवरक्षक शस्त्रक्रिया तसेच उपचारांपासून वंचित राहावे लागल्याची माहिती मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयातील कर्करोगतज्ञ डॉ. राकेश बधे यांनी दिली आहे. या काळात केमोथेरपी तसेच फॉलोअप पुढे ढकलण्यात आल्या. अगदी मुख्य शहरांमधील कर्करोग देखभालीकरिता वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जाणाऱ्या रूग्णसंख्येत सुमारे 50 टक्क्यांनी घट झाली. गतवर्षीच्या तुलनेत शस्त्रक्रियांमध्ये देखील घट नोंदवली गेल्याचेही त्यांनी सांगितले.























































