नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील 16 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे नागपूर महानगर पालिकेकडून संपूर्ण महाविद्यालय इमारत सील करण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेले सर्वजण महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी आहेत. कोरोनाचा सामूहिक प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आठवडाभरासाठी डॉ. आंबेडकर कॉलेजचा परिसर सील करण्यात आला आहे.

विदर्भातील सत्र न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत कपा, मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सत्र न्यायालयांच्या कामकाजाचे तास कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशीम या जिह्यांतील सत्र न्यायालये सकाळी साडेदहा ते दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहेत. तशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने काढली आहे.