तिरुपती बालाजीला अर्पण केले दोन कोटींचे शंख–चक्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती असलेल्या आंध्रप्रदेशातील तिरूपती बालाजीला एका भाविकाने चक्क साडेतीन किलो सोन्याचे शंख-चक्र अर्पण केले आहे. चेन्नईच्या थेनी जिल्ह्यातील थंगादुरई या भाविकाने हे सोने अर्पण केले आहे.

बाजारभावानुसार त्यांनी अर्पण केलेल्या सोन्याची किंमत दोन कोटी रुपयांच्या आसपास आहे. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, ’थंगादुरई गेल्या 5 दशकांपासून तिरूमाला मंदिरात भगवान व्यंकटेश्वराच्या पूजेसाठी येतात. गतवर्षी ते कोरोनाने संक्रमित झाले होते. त्याकेळी आपल्या चांगल्या प्रकृतीसाठी त्यांनी देवाकडे साकडे मागितले होते. त्यानुसार, कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी देवाला सोन्याचे शंख आणि चक्र अर्पण केले आहे.’