
प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओआढळून आल्यानंतर मुंबईसह हिंदुस्थानात खळबळ उडाली असून यासाठी अंबानींच्या घराची तब्बल एक महिनाभर रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. तर स्कॉर्पिओमध्ये आढळून आलेल्या जिलेटीनच्या कांडय़ांचे नागपूर कनेक्शनदेखील उघड झाले असून याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. या तपासाची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या क्राईम बँचसह राष्ट्रीय तपास पथकावर (एनआयए) सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एपूण दहा पथके तैनात केल्याचे कळते.
रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील अँटिलिया या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओआढळून आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेचा तपास मुंबई पोलिसांची क्राईम ब्रँचकडून सुरू करण्यात आला असून ज्या गाडीत ही स्फोटके ठेवण्यात आली. ती चोरीची असल्याचे शुक्रवारी तपासात समोर आले आहे तर अँटिलिया अगोदर ही स्कॉर्पिओआणि इनोक्हा इतर अनेक ठिकाणी थांबल्याचे कळते.
अंबानींनी मानले मुंबई पोलिसांचे आभार
‘मुंबई पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने निर्णय घेत कारवाई केली असून त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे की, या प्रकरणामध्ये पोलीस लवकरच वेगाने त्यांचा तपास पूर्ण करतील,’ अशा शब्दांत मुकेश अंबानी यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.
दोन्ही गाडय़ा ठाण्याहून आल्या
24 फेब्रुवारीला मुलुंड चेक नाका येथून एक इनोक्हा आणि स्कॉर्पिओगाडी मुंबईच्या दिशेने येत असल्याचे सीसीटीक्हीत पैद झाले. जिलेटीनच्या काडय़ा असलेली स्कॉर्पिओगाडी ही प्रियदर्शनी येथे थांबली होती. तर रात्री 1. 20 मिनिटांनी इनोक्हा गाडी ही मुलुंड चेकनाका येथून निघाली. त्यानंतर त्या दोन्ही गाडय़ा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा खडा पारशी पुतळा असे करून त्या दोन्ही गाडय़ा कार्माइकल रोड येथे गेल्या. इनोक्हा गाडी सुरुवातीला उभी केली. त्यानंतर स्कॉर्पिओगाडी तेथे आली. त्या गाडीतून एकजण उतरला. त्यानंतर इनोक्हा गाडीत दोन जण बसून ते ठाण्याच्या दिशेने निघून गेल्याचे तपासात समोर आले आहे.
गाडी चोरीची
ती गाडी ठाण्यातील एका उद्योजकाची होती. 16 फेब्रुवारीला ऑपेरा हाऊसला जात असताना गाडीचे स्टेअरिंग जाम झाल्याने त्यांनी विक्रोळी जवळच पार्क केली होती. मात्र 17-18 फेब्रुवारीला ती गाडी तेथून चोरीला गेल्याने उद्योजकाने विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यासंदर्भात विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. या गाडीच्या चेसिस नंबरशीदेखील छेडछाड करण्यात आली आहे.
ई चलन ठरणार महत्त्वाचे
स्फोटक असलेली स्कॉर्पिओगाडी रस्त्यावर उभी केल्याने वाहतूक पोलिसांनी त्या गाडीला क्लॅम्प केले होते. त्या गाडीवर ई चलन केले होते. ते ई चलन हे तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत.
मुंबई इंडियन्सच्या बॅगमध्येच
आढळले धमकीचे पत्र
अँटिलियाजवळ पार्क करण्यात आलेल्या गाडीत ठेवण्यात आलेल्या एका मुंबई इंडियन्सच्या बॅगमध्ये हे पत्र सापडले असून कॉम्प्युटरवर टाईप केलेले हे पत्र आहे.
स्पह्टके नागपूरच्या सोलर एक्सप्लोझिव्ह पंपनीची
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारमधील जिलेटीनच्या कांडय़ा नागपूर येथील इका@नॉमिक एक्सप्लोझिक्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. ही स्फोटके विहीर खोदकाम व खदाणीत वापरण्यात येतात. सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी यासंबंधी मुंबई पोलिसांनी माहिती दिली. गुरुवारी मध्यरात्री 1.30 वाजता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांडय़ा सोलर एक्सप्लोझिक्हमध्ये तयार झाल्या आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली’, असे नुवाल यांनी सांगितले.
पोलीस तपासातील प्रमुख मुद्दे
– स्कोर्पिओ पार्क करणाऱ्यांनी तब्बल एक महिना अंबानी यांच्या बंगल्याची रेकी केली होती तर अनेक वेळा त्यांनी मुकेश अंबानी यांच्या गाडय़ांच्या ताफ्यांचा पाठलागदेखील केला होता.
– पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओमधून तब्बल 20 नंबर प्लेट आढळून आल्या असून यातील अनेक नंबर प्लेट्स या अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाडय़ांच्या नंबरशी मिळत्याजुळत्या आहेत.
– सीसीटीक्ही फुटेजमध्ये अँटिलिया येथे दोन गाडय़ा दिसून आल्या आहेत. त्यात एक इनोक्हादेखील सामील होती. त्यातील स्कॉर्पिओयाठिकाणी पार्क करण्यात आली होती.
– अँटिलियासमोरील एका दुकानाच्या सीसीटीक्ही फुटेजवरून पोलिसांना अनेक महत्वपूर्ण पुरावे मिळाले असून या स्कॉर्पिओमधील चालक दोन तासांहून अधिक वेळ गाडीतच बसून होता. त्यानंतर गाडीच्या मागच्या दाराने बाहेर पडला. त्याने मास्क परिधान केल्याने त्याची ओळख पटलेली नाही.
– ही कार ज्या ठिकाणाहून आली आहे, त्या सर्व ठिकाणाचे सीसीटीक्ही फुटेज पोलीस तपासून पाहत आहेत.
– पोलिसांच्या माहितीनुसार अंबानी पुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी गेल्या काही महिन्यांत धमकीचे पत्र किंवा का@ल आलेला नाही.
10 पथके आणि त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी
– पहिले पथक – या पथकाकडे अँटिलियाजवळील सर्व सीसीटीक्ही फुटेज एकत्र करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
– दुसरे पथक – पोलिस मुख्यालयातील सीसीटीक्ही फुटेज तपासून पाहणार आहेत.
– तिसरे पथक – मुंबई पोलिस मुख्यालयाजवळील आणि क्रार्फड मार्पेट परिसरातील सीसीटीक्ही फुटेज गोळा करणार आहे.
– चौथे पथक – अँटिलियाजवळ राहणाऱ्या संशयित लोकांची माहिती एकत्रित करणार.
– पाचवे पथक – फॉरेन्सिक टीमबरोबर पुरावे गोळा करण्यासाठी हे पथक काम करणार आहे.
– सहावे पथक – 2013 साली इंडियन मुजाहिद्दीनकडून अंबानी पुटुंबियांना धमकी आली होती. त्याअनुषंगाने तपास करणार.
– उर्वरित पथके – आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणी जाऊन तपास करणार आहेत.





























































