बुमराहची चौथ्या कसोटीतून माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘टीम इंडिया’चा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यातून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणामुळे बुमराहने माघार घेतल्याची माहिती हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानी संघ 2-1ने आघाडीवर आहे. इंग्लंडला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत विजय अनिवार्य आहे, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी हिंदुस्थानला हा सामना जिंकणे किंवा अनिर्णित राखणे गरजे आहे. मात्र निर्णायक कसोटीपूर्वीच जसप्रीत बुमराहने माघार घेतली आहे. काही वैयक्तिक कारणांसाठी संघातून आणि बायो-बबलमधून बाहेर जाण्याची आपल्याला परवानगी द्यावी, अशी विनंती बुमराहने बीसीसीआय व्यवस्थापनाला केली होती.