भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण; 50 हजारांच्या रोखीवर वरवरा यांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी हायकोर्टाकडून जामीन मिळून ही कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अद्याप सुटका न झालेल्या तेलुगू कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने 50 हजारांच्या कॅश बॉण्डवर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन हमीदारांची प्रक्रिया 5 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याची मुभा हायकोर्टाने राव यांना दिली आहे.

हायकोर्टाने राव यांना वैद्यकीय कारणास्तव केवळ सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. त्यात 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यासह तेवढय़ाच रकमेचे दोन हमीदार देण्यास न्यायालयाने बजावले. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटामुळे दोन हमीदारांविषयीची प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागत असून आधी रोखीच्या बॉण्डवर सुटका करावी व नंतर विशिष्ट कालावधीत हमीदार देऊ असे राव यांच्या वतीने  सांगण्यात आले.