
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्वीडन कंपनी ट्रू कॉलरने आता गार्डियन हे ऍप लाँच केले आहे. या ऍपमध्ये तुम्ही ‘ऑलवेज शेअर लोकेशन’ सिलेक्ट करून आपल्याजवळच्या व्यक्तींसोबत नेहमी लोकेशन शेअर करता येणार आहे.
एखाद्या ठिकाणी जाताना लोकेशन शेअरिंग करण्याचा किंवा पाहिजे तेव्हा लोकेशन शेअर बंद करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. स्वीडन आणि हिंदुस्थानातील टीमने मिळून 15 महिन्यांत या ऍपची निर्मिती केली आहे. पर्सनल सेफ्टी आणि लोकेशन शेअरिंगसाठी सध्या शेकडो ऍप उपलब्ध आहेत, परंतु गार्डियन हे ऍप त्यांच्यापेक्षा वेगळे असल्याचा दावा कंपनीने केला आहे. युजर यापूर्वीच ट्रू कॉलर वापरत असेल तर त्याच आयडीवरून गार्डियनवर लॉगिन करता येईल. ट्रू कॉलर नसल्यास फोन नंबर व्हेरिफिकेशनद्वारे लॉगिन करता येईल.























































