अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक सुंदर बदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातले सर्वात सुंदर बदक नुकतेच अरुणाचल प्रदेशात आढळले आहे. ‘मंदारिन’ बदक अशी त्याची ओळख आहे. या बदकाची प्रजाती केवळ पश्चिम युरोप आणि अमेरिकेत आढळते. अरुणाचल प्रदेशात हे बदक दिसल्याने पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मंदारिन बदकाचा व्हिडीओ शेअर करून याबाबतची माहिती दिली. मंदारिन बदक ही इस्ट प्लेर्केटिकमधील मूळ परचिंग बदकाची एक प्रजाती आहे. ते अरुणाचल प्रदेशातील दिरंग खोऱयानजीकच्या तलावात पोहताना आढळले. 18 सेकंदांच्या या व्हिडीओत मंदारिन बदक अन्य बदकांसोबत पोहत आहे. हा व्हिडीओ वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ट्विटरवर प्रसारित केला आहे. या सुंदर बदकाच्या संरक्षणासाठी वन विभाग आणि स्थानिकांनी विशेष तयारी केली आहे.

एकेकाळी मंदारिन बदकाची प्रजाती पूर्व आशियात विस्तारली होती, मात्र बेसुमार जंगलतोडीने या बदकांचे प्रमाण कमी झाले. एका अहवालानुसार आता फक्त एक हजारापेक्षा कमी जोडय़ा शिल्लक राहिल्या आहेत.