
महाराष्ट्र व्यवसाय कर विभागात व्यवसाय करदात्यांना अंतिम दिनांकापूर्वी कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणी धारक तथा नोंदणीधारक व्यवसाय करदात्यांनी आपला सन 2020-21 या वर्षाचा देय व्यवसाय कर 31/03/2021 पूर्वी भरावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
नवीनच करपात्र झालेल्या करदात्यांनी कायद्याप्रमाणे नावनोंदणी किंवा नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.medahedagst.goved.in या संकेतस्थळावर भेट देऊन नावनोंदणी किंवा नोंदणी प्रमाणपत्र मिळवावे असेही विभागाने जाहीर केले आहे.
























































