शेतकऱ्याने घरातच बनवली ‘इलेक्ट्रिक कार’, सिंगल चार्जमध्ये गाठते 300 किमीचा पल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात सातत्याने इलेक्ट्रिक कारची मागणी वाढताना दिसत आहे. कंपन्या या सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक अशा कार लाँच करून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच कोणत्याही तंत्रज्ञानाविना ओडिशा येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने चार चाकी इलेक्ट्रिक वाहन बनविले आहे. ही इलेक्ट्रिक कार सौर उर्जावर चालणाऱ्या बॅटरीवर धावते.

ही इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सुशील अग्रवाल असे आहे. या कारमध्ये 850 वॅट्सची मोटर, 100 Ah/ 54 Volts बॅटरी वापरण्यात आली आहे. हे वाहन एकादा चार्ज केल्यावर 300 किमी पर्यंत धावण्यास सक्षम आहे.

sc

कार बाबत माहिती देताना सुशील यांनी सांगितलं की, या कारची बॅटरी ही सुमारे 8 तासात पूर्णपणे चार्ज होते. त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, या वाहनात वापरलेली बॅटरी खूप हळू चार्ज होते, मात्र याचे आयुष्य 10 वर्षांपर्यंत आहे.

अशी सुचली कार बनवण्याची कल्पना

सुशील अग्रवाल म्हणाले, जेव्हा लॉकडाऊन बंदी लागू केली गेली, तेव्हा मी माझ्या घरीच होतो. लॉकडाऊन संपल्यानंतर लवकरच इंधनाचे दर वाढतील, हे मला ठाऊक होते. म्हणून मी स्वत: ची कार बनवण्याचा निर्णय घेतला. ही कार बनविण्यासाठी त्यांनी काही पुस्तके वाचली आणि यूट्यूबवर व्हिडीओ पाहिले.