
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी नेहमी त्याच्या हटके हेअर स्टाईलमुळे चर्चेत असतो. एकेकाळी त्याची लांब केसाची स्टाईल खूप लोकप्रिय होती. अनेकांनी या स्टाईलचे अनुकरण केले. आताही धोनी एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे.
#VIVOIPL salutes the new Indian spirit that is eager to innovate and rewrite the rulebook.
Will history be created yet again this IPL?
Join us in celebrating #IndiaKaApnaMantra.
LIVE from Apr 9 | Broadcast starts 6 PM, Match starts 7:30 PM | Star Sports & Disney+Hotstar VIP pic.twitter.com/6IcKGwy4np
— Star Sports (@StarSportsIndia) March 14, 2021
आयपीएलची अधिकृत प्रसारण वाहिनी असलेल्या स्टार स्पोर्ट्सने हा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. फोटोमध्ये धोनीने मुंडन केले दिसत असून तो बौद्ध भिख्खूच्या कपडय़ांमध्ये बसलेला दिसतोय. हा फोटो अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. धोनीने हा लुक नेमका कशासाठी केलाय, हे समजलेले नाही. मात्र आयपीएल 2021 संबंधित जाहिरातीचे शूटिंग करण्यासाठी हा लुक असावा, असा अंदाज आहे. सध्या आयपीएलच्या तयारीत तो गुंतला आहे.




























































