
ऍमेझॉन प्राईम व्हिडीओने आज त्यांचा पहिला मराठी चित्रपट ‘पिकासो’चा ट्रेलर सादर केला आहे. अभिनेता प्रसाद ओक, बालकलाकार समय तांबे आणि अश्विनी मुकादम यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात अस्वस्थ मद्यपी वडील व मुलाच्या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दर्शवली आहे. शिलादित्य बोरा निर्मित ‘पिकासो’चे दिग्दर्शन अभिजित वारंग यांनी केले आहे तर सहलेखन तुषार परांजपे यांचे आहे. जगभरातील ऍमेझॉनच्या प्राईम सदस्यांना 19 मार्चपासून हा चित्रपट पाहता येईल.






























































