
2013 मध्ये मालाड येथे बिल्डर अजय गोसालिया याच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाने 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी छोटा राजन आणि त्याच्या पाच साथीदारांना मोक्का कायद्यांतर्गत ही शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणात 50-60 साक्षीदारांची तपासणी केली. त्यात गोसालिया याचाही समावेश होता. या गोळीबारात गोसालिया हा जखमी झाला होता.
























































