पिस्तूल बाळगणाऱ्या विद्यार्थ्याला पकडले, बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशत माजविण्यासाठी पिस्तूलासह काडतुसे बाळगणाऱ्या बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या विद्याथ्र्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे असा 52 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अनिकेत राजू वसवे (वय 21, रा. अपर बिबवेवाडी, मूळ-वसवेवाडी, हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कुंभारवाडा परिसरात एकजण पिस्तूल घेउन थांबल्याची माहिती अमित पुजारी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाउन अनिकेत वसवे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल आणि दोन जिंवत काडतुसे असा 52 हजारांचा ऐवज सापडला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, अमित पुजारी, दीपक लोधा, सतीश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अमोल शितोळे, तानाजी सागर यांच्या पथकाने केली.