मुंबईत 1000 मेगावॅट वीज आणण्याचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत तब्बल 1000 मेगावॅट अतिरिक्त वीज आणण्याचा मार्ग मोकळा झाल आहे. 12 ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी इलेक्ट्रिसिटीने राज्याच्या ग्रीडमधून मुंबईत अतिरिक्त वीज आणता यावी म्हणून पालघर जिल्ह्यातील पुडूस येथून आरे कॉलनीपर्यंत तब्बल 80 किलोमीटर लांबीची वीज वाहिनी टाकण्यासाठी पारेषण परवाना मिळवण्याकरिता वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) याचिका दाखल केली होती. त्यानुसार आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रा. लिमिटेड या पंपनीला आंतरराज्य पारेषण परवाना दिला आहे. जवळपास 7600 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा पारेषण प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत.

मुंबईची सध्या विजेची कमाल मागणी साडेतीन हजार मेगावॅटच्या घरात आहे. तर मुंबई परिसरातील वीज प्रकल्पातून उपलब्ध होणारी वीज आणि महापारेषणच्या वीज वाहिन्यांच्या माध्यमातून राज्यभरातून येणाऱया विजेचा आकडा जवळपास 3800 मेगावॅट आहे. त्यामुळे सध्याची विजेची मागणी पूर्ण होत आहे. मात्र प्रत्येक वर्षी मुबईची वाढणारी विजेची मागणी आणि वीज वाहिन्या आणि वीज प्रकल्पांमध्ये होणाऱया तांत्रिक बिघाडाचा विचार करता मुंबईत राज्यभरातून अतिरिक्त वीज आणण्यासाठी पर्यायी वीज वाहिन्यांची गरज आहे.

त्याची दखल घेत अदानी इलेक्ट्रिसिटीची सह पंपनी असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रा. लिमिटेडने पुडूस येथील महापारेषणच्या 400 केव्हीच्या उच्चदाब वीज वाहिनीपासून आरे कॉलनीतील 220 केव्हीच्या वीज उपपेंद्रापर्यंत हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट असलेली उच्चदाब वीज वाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वीज आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सदर वीज वाहिनी उभारल्यानंतर राज्याच्या ग्रीडमधून मुंबईत अतिरिक्त वीज आणने शक्य होणार आहे.

वीजवाहिनीच्या कामावर स्वतंत्र कमिटीचा वॉच

मुंबईची विजेची मागणी वर्षाला सुमारे दीडशे-दोनशे मेगावॅटने वाढत आहे. त्याची दखल घेत वीज आयोगाने सदर वीज वाहिनी उभारण्याचे काम पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वीज वाहिनीचे काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून त्यावर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमली असून वीज आयोग त्याचा वेळोवेळी आढावा घेणार आहे.