
तुम्ही आमच्या सरकारच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला तडकावले आहे. ते जे कागद फडफडवत आहेत त्या कागदपत्रांमध्ये काहीच नाही. गृह सचिवांना त्याचा अभ्यास करायचा असल्यास करू द्या, असे सांगतानाच खासदार राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही चांगलाच टोला हाणला.
ते म्हणाले, लोकशाहीत अनेकांना दुसऱयांदा मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. कोणाला गृहमंत्री तर कुणाला राष्ट्रपती. मात्र बहुमत असलेल्या सरकारला दिल्लीत घेरून पाडले जात नाही. तुम्ही गृहमंत्र्यांकडे जा, नाहीतर पंतप्रधानांकडे जा. जोपर्यंत तुमच्याकडे बहुमत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही.































































