
कराड नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नगरसेनकांना कोरोनाची चाचणी सक्तीची असून जे कर्मचारी तपासणी करणार नाहीत. त्यांना नगरपालिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेश कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिले आहेत.
मंगळवारी नगरपालिकेतील अधिकारी व नगरसेवकांसह नागरीकांना कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी दोन ठिकाणी स्वॅब टेस्टची तर चार ठिकाणी लसीकरणाची सुविधाही कराड नगरपालिकेने केली आहे. कराड शहरातील 45 वर्षावरील सगळ्यांचेच लसीकरण होणार आहे. यासाठी त्वरीत शहरात कालपासून तीन लसीकरण केंद्रे उभारली आहेत. आणखी एक केंद्र वाढवले आहे. तर स्वॅब टेस्टसाठी दोन ठिकाणी सोय केली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डाके यांनी दिली.
कराड शहरात 76 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. कोरोनावर नियंत्रण यावे, यासाठी लसीकरणासह कोरोनाची तपासणी मोहिम हाती देण्यात आली आहे. कराड शहरतील 45 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. ते पूर्ण करण्यासाठी शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र सूरू केले आहेत. नगरपालिकेच्या इमारतीसह नागरी आरोग्य केंद्राशिवाय त्रिशंकू भाग, कार्वे नाका, बैल बाजार रोड भाग, कोल्हापूर नाका, भेदा चौक परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
कराड शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून नगरपालिका अधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. चाचणी न करणाऱ्यांना नगरपालिकेत प्रवेश दिला जाणार नाही.
























































