
राज्य सरकारने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याची मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वास्तुविशारद, परवानाधार सर्वेक्षक, अभियंते, प्लंबर आणि कन्स्टलंटट यांची कार्यालये सुरु करण्यात मुभा द्यावी त्याशिवाय बांधकामच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगारांची आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अॅण्टीजन चाचणी घेण्यास सवलत द्यावी, अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आली असून या मागणीसाठी असोसिएशनकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांवर गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया हे महत्वाचे सण येत असल्याने या दिवशी बिल्डर्सना त्यांची विक्री कार्यालये सुरु ठेवण्याची परवागनी द्यावी, अशी मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुंबईचे अध्यक्ष मोहिंदर रिजवानी यांनी केली.




























































