संभाजी भिडेंचे वक्तव्य तपासून कारवाई करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनासंदर्भात शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केलेले विधान तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत दिली. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी चार दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांचा अवमान होईल, असे वादग्रस्त विधान केले होते.  आज पालकमंत्री पाटील यांना भिडे यांच्या या विधानावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते बोलत होते. देशाचे पंतप्रधान ते सामान्य माणूस कोरोनाच्या या गंभीर संकटाशी लढत असताना असे विधान करून अपमान केला आहे. त्याचबरोबर गैरसमजही निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानाची सत्यता पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.