अमेरिकन डॉलरच्या बहाण्याने जेष्ठाला लाखाचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने तिघाजणांनी जेष्ठाला 99 हजारांचा गंडा घातला. ही घटना 12 एप्रिलला दुपारी पावणेएकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर नीलायम ब्रीजजवळ घडली. याप्रकरणी राजू वाघमारे (वय 60) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाघमारे यांची एका मित्राच्या ओळखीतून आरोपींसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी राजूला अमेरिकन डॉलरच्या नोटा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार आरोपींनी राजूला काल दुपारी पैसे घेउन नीलायम ब्रीजजवळ बोलाविले. डॉलरच्या आमिषाने राजू रक्कम घेउन त्याठिकाणी गेले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून 99 हजार रुपये घेतले. त्यांना एक पिशवी देउन त्यामध्ये अमेरिकन डॉलर असल्याचे भासविले. राजू यांनी पिशवी उघडून पाहिली असता, त्यामध्ये कागदाचे बंडल मिळून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कस्पटे तपास करीत आहेत.