
नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविच याला गुरुवारी मोण्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. ग्रेट ब्रिटनच्या डॅन इवान्सकडून नोवाक जोकोविचला अंतिम 16 च्या लढतीत हार सहन करावी लागली. यामुळे नोवाक जोकोविचचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
नोवाक जोकोविच याने 2013 व 2015 साली ही या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. 33 व्या रँकिंगवरील डॅन इवान्सने नोवाक जोकोविचची पाच वेळा सर्व्हिस मोडून काढली. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नोवाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर पहिल्यांदाच त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.




























































