सिरमची लस जगभरात हिंदुस्थानात सर्वात महाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीकरणाच्या तिसऱया टप्प्यात 18 कर्षांकरील सर्वच नागरिकांना लस घेण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिटय़ुटने ‘कोविशिल्ड’ या लसीची किंमत जाहीर करत खुल्या बाजारात 600 रुपयांत मिळेल, असे जाहीर केले आहे.

मात्र, इतर देशांच्या तुलनेत पुण्यात तयार होणारी सिरमची लस जगभरात हिंदुस्थानातच सर्वाधिक महाग तर अमेरिका, ब्रिटन, बांगलादेश आदी देशांत स्वस्त असल्याचे दिसून येत आहे.

‘सिरम’चे स्पष्टीकरणः ‘कोविशिल्ड’ लस स्वस्त

हिंदुस्थानसह विविध देशांच्या सरकारांकडून लसीकरणासाठी खरेदी केलेल्या लसीचे दर फार कमी आहेत. कारण लसींच्या डोसची संख्या खूप मोठी आहे. जगभरात लसीचे दर जास्त असतात पण सरकारसाठी लसीची किंमत खुल्या बाजारातील दरांपेक्षा एक तृतीयांश दरात उपलब्ध करून दिली जात आहे.

जगभरात मिळणाऱया कोरोना लसीची आणि हिंदुस्थानातील लसीच्या किंमतीची तुलना करणे अयोग्य आहे. ‘कोविशिल्ड’ ही सर्वात स्वस्त लस आहे.

सुरूवातीच्या काळात ‘कोविशिल्ड’ ची किंमत फारच कमी ठेवण्यात आली. कारण जोखीम घेत लस निर्मितीसाठी विविध देशांनी आधीच निधी उपलब्ध करून दिला होता.

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना विषाणूच्या रचनेत बदल (म्युटेशन) होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महामारी विरूद्ध लढण्यासाठी आणि जनतेचे प्राण वाचविण्यासाठी लसीची क्षमता वाढविण्यासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे.

कोविशिल्ड लस दरपत्रक

हिंदुस्थान – 600 रुपये
सौदी अरेबिया – 395 रुपये
दक्षिण आप्रिका – 395 रुपये
अमेरिका – 300 रुपये
बांगलादेश – 300 रुपये
ब्राझील – 237 रुपये
ब्रिटन – 226 रुपये
युरोप – 264 रुपये