
शहरातील मध्यवस्तीतील नाना पेठेत असलेल्या शितळादेवी मंदिरातून चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुखवटा आणि दान पेटीतले चिल्लर चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यानंतर चोरी केल्याचे कोणालाही समजू नये यासाठी चोरट्यांनी मंदीरातील सीसीटीव्हीचा डिव्हीआर बॉक्सही चोरून नेला आहे. ही घटना काल सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी भरत कोटा (वय 40)) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानापेठेतील नवावाडा परिसरात असलेल्या शितळादेवीच्या मंदिरात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुकुट आणि दान पेटीमधील चिल्लर चोरुन नेला. तसेच चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सीसीटीव्हीचा डिव्हीआर जाताना काढून नेला आहे. रविवारी सकाळी पुजारी भरत कोटा मंदिरात आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.


























































