
संचारबंदी काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची कराड नगरपरिषदच्या नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने कोल्हापूर नाका येथे कोरोना चाचणी करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. नाक्यावरील नाकाबंदी ठिकाणी चाचणी सुरू असून 50 वाहन चालकांची चाचणी करण्यात आली आहे.
विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. काही दुचाकीस्वार नाहक फिरताना दिसत असल्याने पोलिसांनी प्रारंभी दूचाकी जप्त करण्यास सूरूवात केली. काही जण विनाकारण फिरताना दिसत असल्याने नगरपरिषदचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी विनाकारण फिरणार्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
नागरी आरोग्य केंद्राच्या लॅब टेक्निशियन अनिता पवार, नपा कर्मचारी पंकज काटरे, शुभम कांबळे, प्रणयजीत कांबळे, सूरज थोरात, प्रसाद जाधव, प्रसाद कांबळे, तुषार सोरटे, सोहेब मूल्ला, सुजीत साळुंखे, ओमकार भोकरे ही टीम कोल्हापूर नाक्यावरील नाकाबंदी केंद्रावर चाचणीसाठी काम करीत आहेत.






























































