बुटांना 13 कोटींची विक्रमी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचा रॅप सिंगर कान्ये वेस्ट हे नेहमी चर्चेत राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. आताही कान्ये चर्चेत आलाय. त्याच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झालीय. ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळ्यात त्याने वापरलेले स्निकर्स बूट एका लिलावात 1.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 13 कोटींना विकले गेले आहेत. सोमवारी या लिलावाची माहिती देण्यात आली.

कान्ये वेस्टने 2008 साली ग्रॅमी सोहळ्यात हे स्निकर्स बूट वापरले होते. ‘हे मम्मा’ आणि ‘स्ट्राँगर’ गाणे सादर करताना त्याने हे स्निकर्स वापरले होते. 12 नंबरच्या या ब्लॅक लेदर स्निकर्समध्ये फोरफूट स्ट्रेप असून लेसवर ब्रॅण्डचे आद्याक्षर आहे. न्यूयॉर्पचे संग्राहक रयान चँग यांनी कान्येच्या बुटांना सोथबेच्या लिलावात ठेवले होते. रेअर्स या स्निकर इन्वेस्टिंग प्लॅटफॉर्मने हे बूट विकत घेतले. स्निकर्सवर लागलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आहे. याआधी बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डन याने घातलेल्या स्निकर्सला 5 लाख 60 हजार अमेरिकन डॉलर्सची विक्रमी बोली लागली होती.