एटीएममधून पैशांऐवजी लंपास केलं सॅनिटायझर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडियो धुमापूळ घालत असतात. असाच एक व्हिडियो सध्या कोरोनाच्या कठीण काळात सगळ्यांच्या चेहऱयावर हसू फुलवतोय. आजवर आपण एटीएममधून पैसे चोरीला गेल्याचे अनेकदा ऐकले आहे. पण आता मात्र एटीएममधील अशी वस्तू चोरण्यात आली आहे जे पाहून हसावं की रडावं हेच समजत नाही. ही वस्तू म्हणजे हँड सॅनिटायझर.

एटीएममधील चोरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला तर ही व्यक्ती एटीएममध्ये आहे खरी. पण एटीएममधून पैसे वगैरे काढत नाही आणि एटीएमपेक्षा जास्त लक्ष तर त्या सॅनिटायझर बाटलीकडेच आहे. त्यामुळे खरंतर ही व्यक्ती सॅनिटायझरच चोरायला आली होती, हे स्पष्ट दिसत आहे. आपल्याला कुणीच पाहत नाही असे त्या व्यक्तीला वाटतेय. पण ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे.