
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने तीन हजार पह्ल्डेबल बेड खरेदी करणार आहे. यासाठी सुमारे 13 कोटींचा खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
मुंबईतील कोविड नियंत्रणात येत असला तरी जुलै- ऑगस्टमध्ये कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी महानगरपालिका आतापासूनच तयारीला लागली आहे. चार ठिकाणी एक हजार बेड्सचे जम्बो कोविड पेंद्र उभारण्याचे काम सुरू आहे, तर रुग्णालयात प्राणवायू प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता 3 हजार हॉस्पिटल बेड्स खरेदी करण्यात येणार आहेत. या प्रत्येक बेडसाठी 6 हजार 370 रुपये, दोन हजार बेड साइड लॉकर यासाठी प्रत्येकी 4 हजार 750 रुपये आणि 3 हजार आयव्ही स्टॅण्ड विकत घेण्यात येणार आहेत. या आयव्ही स्टॅण्डसाठी प्रत्येकी 1 हजार 18 रुपये असे 2 कोटी 86 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
कोविडच्या दुसऱया लाटेत मुंबईत व्हेंटिलेटरवर प्रचंड ताण आला होता. त्यामुळे आता 100 व्हेंटिलेटरही विकत घेण्यात येणार आहेत. या प्रत्येक व्हेंटिलेटरच्या देखभालीसाठी पालिका 17 लाख 27 हजार रुपये असे 10 कोटी 57 लाख रुपये खर्च करणार आहे. या दोन्ही प्रस्तावांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.




























































