IPL 2021 : 48 तासात पोलार्डने तोडला पृथ्वी शॉचा रेकॉर्ड, लगावले जलद अर्धशतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्जमध्ये झालेल्या रोमांचकारी सामन्यात पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी विजय खेचून आणला. पोलार्डच्या तडाखेबंद फलंदाजी पाहणे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली. पोलार्डने अवघ्या 34 चेंडूत 87 धावा केल्या. यात 8 षटकार व 6 चौकारांचा समावेश होता.

मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या पोलार्डने अवघ्या 17 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या या सिझनचे हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉने 18 चेंडूत अर्धशतक ठोकत रेकॉर्ड केला होता. त्याच्या हा रेकॉर्ड फक्त 48 तासच त्याच्या नावावर राहिला. शनिवारी पोलार्डने 17 चेंडूत 50 धावा करत नवीन रेकॉर्डल बनवला.

मात्र आतापर्यंतच्या सर्व आयपीएलमधील फास्टेस्ट फिफ्टीचा रेकॉर्ड केएल राहुलच्याच नावावर आहे. राहुलने 2018 मध्ये 14 चेंडूत अर्धशतक केलं होतं. त्याआधी केकेआरच्या सुनील नरेनने 2017 मध्ये 15 चेंडूत अर्धशतक केलेले.