
ऑनलाइन वेब सेक्स रॅकेट चालवणाऱयाला क्राईम ब्रँचच्या युनिट-8 ने अटक केली. निसार खान रझाक खान ऊर्फ करण ठाकूर असे त्याचे नाव असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. काही दिवसांपूर्वी युनिट- 8ने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून चौघांना अटक केली होती. त्या कारवाईदरम्यान निसार हा पळून गेला होता. पोलिसांनी पकडू नये म्हणून तो काही महिने कर्नाटकला जाऊन राहिला होता. त्यानंतर तो दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आला होता. मुंबईत येताच त्याने तीन महिलांच्या मदतीने वेब सेक्स रॅकेट सुरू केले होते.
























































