ना ओळखपत्र ना रिपोर्ट, कोरोना संशयितांना थेट ऍडमिशन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट नसला तरी कोरोना संशयित रुग्णाला अॅडमिशन द्या, या संशयित रुग्णावर उपचार सुरू करा असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच कोणत्याही राज्यातील, जिह्यातील पिंवा शहरातील रुग्ण कुठेही उपचार घेऊ शकतो. त्यासाठी आता ओळखपत्राची गरज लागणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले आहे. रुग्णालयात वेळेवर बेड न मिळाल्यामुळे, ऑक्सिजनच्या अभावामुळे मृतांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनाची लक्षणे तर आहेत, पण आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट वेळेवर मिळत नाही. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णाला अॅडमिशन दिले जात नाही. या रिपोर्टच्या सक्तीमुळे देशभरात अनेक रुग्णांचे मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोनाच्या राष्ट्रीय धोरणात बदल केला आहे. त्यामुळे कोरोना संशयित रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

काय आहेत आदेश

कोरोना चाचणीच्या पॉझिटिव्ह रिपोर्टची सक्ती रुग्णालयांना करता येणार नाही. यामुळे कोरोना संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयात दाखल करून घ्यावे. संशयित रुग्णांसाठीच्या स्वतंत्र वॉर्डमध्ये उपचार सुरू करावेत. रुग्णांना उपचार नाकारू नये.

रुग्णांना ओळखपत्राची सक्ती करू नये. कोणत्याही राज्यातील, जिह्यातील पिंवा शहरातील रुग्ण असो त्यावर उपचार केले पाहिजे. कोणत्याही रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन पिंवा औषध देण्यास नकार दिल्यामुळे होऊ नये.

रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्याला रुग्णालयात दाखल करावे. ज्या रुग्णांना खरोखरच रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, होम आयसोलेशनमध्ये औषध देऊन रुग्ण बरा होऊ शकतो. अशांसाठी बेड अडवून ठेवू नयेत.