
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आरोग्य विमा संरक्षणसह लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजनेची घोषणा नुकतीच केली आहे. या योजनेमध्ये सुरक्षा समृद्धी व सुरक्षा समृद्धी अॅडवांटेज या दोन प्रकारांच्या समावेश आहे. ही मुदत ठेव योजना 1 वर्षाची मुदत ठेव योजना असून 8.50 टक्के व्याज दराने उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना आरोग्य विमा संरक्षणासह 1 लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेत ग्राहकांना कमीतकमी एकरकमी 2 लाख किंवा 1 हजाराच्या पटीत गुंतवणूक करावी लागणार आहे. या योजनेत 18 ते 65 वयोगटातील सभासद सहभागी होऊ शकणार आहेत. ही योजना 3 मे ते 31 जुलै या मर्यादित कालावधीत सुरु राहणार आहे. लोकमान्य सोसायटीच्या 213 शाखांमध्ये ही योजना कार्यान्वित राहणार असून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्लीतील सर्व शाखांमध्ये या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.



























































