
कोरोनाच्या दुसऱया लाटेशी प्राणपणाने झुंजणाऱया हिंदुस्थानची अतिशय दिलासादायक बातमी ब्रिटनमधून आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी दिली जाणारी ऑक्सफर्डची एस्ट्रेजनेका म्हणजेच हिंदुस्थानातील कोविशिल्ड लस कोरोनापासून संभवणारे 80 टक्के मृत्यू रोखण्यात यशस्वी ठरली आहे. या लसीचा पहिला डोस नागरिकांना देताच उत्साहवर्धक असे परिणाम लसीकरणानंतर दिसून आले आहेत. ब्रिटनच्या वैद्यकीय संशोधकांनी या कोरोना प्रतिबंधक लसीला पूर्ण गुण दिले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानच्या कोविशिल्डच्या वापराने कोरोनाला लगाम लावणार हे आता स्पष्ट झाले आहे.
ब्रिटनच्या ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’च्या विश्लेषणानुसार एस्ट्रेजनेका लसीच्या एका डोसनेच कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचा धोका 80 टक्क्यांनी कमी झाला आहे, तर अमेरिकी पंपनी फायझरच्या लसीचे दोन डोस घेतल्यास हा धोका 97 टक्क्यांनी कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हैंकॉक यांनी संशोधकांच्या या आकडेवारीची मुक्तपंठाने प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसींच्या वापराने एक गोष्ट स्पष्ट झालीय की, आपण लसीकरणाने कोरोना महामारीचा बंदोबस्त नक्कीच करू शकतो याची आता खात्री पटली आहे.
हिंदुस्थानला दिलासा
ब्रिटनप्रमाणेच हिंदुस्थानमध्येही कोरोना प्रतिबंधासाठी कोविशिल्ड (ब्रिटनमधील एस्ट्रेजनेका) लसीचा वापर नागरिकांच्या लसीकरणासाठी केला जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे हिंदुस्थानातही कोरोना संक्रमण आणि मृत्यूचे प्रमाण घटताना दिसत आहे. हिंदुस्थानात 18 वर्षांवरील नागरिकांनाही कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस दिले जात आहेत. कोविशिल्ड लस सर्व वयोगटासाठी सुरक्षित असल्याचे हिंदुस्थानात आतापर्यंत तरी दिसून आले आहे.
लसीकरणामुळे आम्ही पुन्हा मुक्त जीवन जगण्याच्या स्थितीत आलोय – जॉन्सन
ब्रिटनच्या 1 कोटी 80 लाख लोकसंख्येपैकी प्रत्येक तिसऱया नागरिकाला आम्ही कोरोना प्रतिबंधक लस टोचली आहे. त्याचा उत्साहवर्धक परिणामही दिसून आला आहे. लसीकरणानंतर कोरोनाचे संक्रमण, रुग्णालयात भरती होणाऱया कोरोना रुग्णांची संख्या निश्चितच घटली असून मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. या शानदार यशामुळे आम्ही ब्रिटनवासी आता पूर्वीसारखे स्वछंदी आणि मुक्त जीवन जगण्याच्या स्थितीत आले आहेत, अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.



























































