
मोबाईल ही आज जीवनावश्यक वस्तू बनली आहे. वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळेजण मोबाईलचा विविध कामासाठी सर्रास वापर करतात. त्यात लॉक़डाऊनमुळे कामासाठी आणि मनोरंजनासाठी गमे खेळण्यासाठी मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे मोबाईलची बॅटरीवर ताण येत असून ती लगेच कमी होत आहे. त्यामुळे फोन चार्ज करण्याची गरज वाढत आहे. मात्र, फोन चार्ज करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रात्रभर फोन चार्जिंगसाठी ठेवू नका
अनेकांना रात्री झोपताना फोन चार्ज करायची सवय असते. फोन चार्जिंगला ठेवत ते झोपून जातात. त्यामुळे फोन रात्रभर चार्ज होत असतो. रात्रभर फोनचार्च केल्याने त्याचा परिणाम फोनच्या बॅटरीवर होतो. ती जास्त तापत असल्याने लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच फोन जास्त गरम झाल्याने त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे रात्रभर फोन चार्जिंगला ठेवणे टाळण्याचा सल्ला देण्यात येतो.
20 टक्क्यांपेक्षा कमी बॅटरी असल्यास वापर थांबवा
अनेकदा फोनवर काम करत असताना किंवा गेम्स खेळत असताना बॅटरी लवकर उतरते. अशावेळी 20 टक्के बॅटरी झाली तरी आपण फोनचा वापर सुरुच ठेवतो. त्याचा फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे फोनची बॅटरी वीस टक्क्यांपर्यत कमी झाली की लगेच फोन चार्जिंगला लावायला हवा. वीस टक्क्यांपेक्शा खाली यायच्याआधी फोन चार्ज करावा.
फोनच्या चार्जरनेच चार्जिंग करावी
अनेकदा घरात सगळ्यांकडेच फोन असल्याने अनेकदा प्लगला असलेल्या चार्जरने फोन चार्ज करण्यात येतो. मात्र, ही चूक करु नका. फोन चार्जिंगसाठी फोनचा चार्जरच वापरावा. कुठलाही चार्जर वापरल्यामुळे त्याचा बॅटरीवर परिणाम होतो. त्याने बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी फोनच्या चार्जरनेच चार्ज करावे.
मोबाईलला कव्हर असताना काळजी घ्या
मोबाईल खराब होऊ नये यासाठी त्याला कव्हर घातले जाते. मात्र कव्हर असताना फोन चार्जिंगला लावल्याने फोन लगेच गरम होतो. तसेच अनेकदा मोबाईलच्या कव्हरमुळे चार्जिंगची पिन नीट लागत नाही. त्यामुळे फोन चार्ज व्हायला वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो मोबाईल चार्ज करताना त्याचे कव्हर काढून फोन चार्जिंगला लावावा.
फास्ट अॅप्सच्या मागे लागू नका
फोन फास्ट चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जिंग अॅप्स डाऊनलोड करतो. हे अॅप्स आपली बॅटरी जास्त खर्च करतात. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर उतरते. त्यामुळे अशा अॅप्सचा वापर शक्यतो करु नये.






















































