
>> डॉ. अनुराधा कुलकर्णी
मराठे काळातील सरदार जेधे यांच्या वाटणीपत्रांमधून तत्कालीन समाजरचनेचे दर्शन होतेच, शिवाय बहुपत्नित्वाची चाल असली तरी स्त्र्ायांचा मान राखून त्यांच्या चरितार्थाची सोय केलेली दिसते. यामुळे पुढे मराठा राज्य संपल्यावर ब्रिटिशांनी तनखे देतानाही प्रथम पत्नी व सवत अशी वेगवेगळी नावे लिहून या स्त्र्ायांना तनखे दिलेले दिसतात. बहुपत्नित्वाची चाल-रूढ असली तरी आणि काही कौटुंबिक भांडणाचे प्रसंग सोडले तर या स्त्र्ाया लढाया, दुष्काळ, परचक्र अशा संकटांना सामोरे जाऊन एकत्र नांदताना दिसतात.
मराठेकालीन समाजजीवन हे शेती व लष्करीप्रधान होते. लष्करात शिपाईगिरी करण्यासाठी घरोघरचे तरुण शिलेदारी करीत. हे शिलेदार लढाईत धारातीर्थी पडले तर त्यांच्या आई, बायकामुले यांना सरकारकडून इनाम जमीन, रोख पैसे दिले जात. या इनामाला नानपरवेशी, बालपरवेशी, रगतरोटी अशी नावे होती. फार्सीमध्ये आईला हाक मारण्याकरिता ‘नना’ असा शब्द आहे आणि आईने मुलाला लडिवाळपणे करायचे संबोधन असाही या शब्दाचा एक अर्थ आहे. तो मराठीतही ‘बाळ’ या शब्दाशी मिळताजुळता आहे. परवेश म्हणजे संगोपन. यावरूनच मराठेकाळात नानपरवेशी आणि बाळपरवेशी असे शब्द धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या आई, बायको व मुलाला दिलेल्या इनामाबाबत येतात.
छत्रपती संभाजीराजांनी फोंडा स्वारीच्या वेळी धारातीर्थी पडलेल्या कृष्णाजी येसाजी कंक यांच्या कुटुंबीयांना दरवर्षी दोनशे होन म्हणजे जवळजवळ पन्नास तोळे सोन्याचे नानपरवेशी किंवा बाळपरवेशी इनाम दिले होते. पानिपत, राक्षस भुवन अशा ठिकाणच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या मराठा सैनिकांनाही शिरस्तेप्रमाणे, म्हणजेच पूर्वी दिले जायचे त्याप्रमाणेच नानपरवेशी व बालपरवेशी इनामे दिल्याचे उल्लेख वाड डायरीजमध्ये आहेत.
मराठा काळात मध्ययुगीन रिवाजाप्रमाणेच बहुपत्नित्वाची चाल होती. आज द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे, पण गतकाळातील चांगल्या-वाईट, रुढी-रिवाज हे त्या काळातील होते, हे लक्षात घेऊनच त्या काळाच्या समाजजीवनाचा विचार करावा लागतो.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सईबाई, सोयराबाई, सकबारबाई, काशीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई व गुणवंताबाई या आठ राण्यांची बखरीतील नावे आणि रायगडावरील आठ महाल, छत्रपती शाहू राजांच्या राणीचे सातारा शहरातील थोरला व धाकटा दारुणी महाल म्हणजे राणीवसा, हे या बहुपत्नित्वाचे साक्षीदारच आहेत. जेधे, शिंदे, होळकर, भोसले, पेशवे अशी सरदार घराणी आणि समाजाच्या सर्वस्तरांमध्ये बहुपत्नित्वाची चाल होती हे कैफियती, दत्तकपत्रे, वाटणीपत्रे अशा तत्कालीन कागदपत्रांमधून समोर येते. अशाच कागदपत्रांमधून पत्नीला ‘कौम’ असा शब्द येतो. रासाई कौम दरस पाटील म्हणजे दरस पाटलाची पत्नी रासाई.
बहुपत्नित्वाची चाल असली तरी या पत्नींचा बहुमान, त्यांची व त्यांच्या मुलाबाळांच्या चरितार्थाची सोय करून ठेवण्याचे उदाहरण शिवचरित्र साहित्याच्या खंडांमधून वाचता येते. मराठेकाळाचा इतिहास शिवकाळापासून ते ब्रिटिशकाळापर्यंत सलगपणे वाचता येतो व त्यावरून मराठेकाळाचा सर्वांगिण इतिहास समजतो, असे सरदार घराणे म्हणजे कारी येथील सरदार जेधे घराणे. जेधे घराण्याचे मूळ पुरुष सरदार कान्होजी जेधे यांना सावित्रीबाई, येसूबाई, चंदावा, रखमाबाई आणि कृष्णाबाई अशा पाच पत्नी होत्या. या पाच पत्नींपासून त्यांना सर्जेराव, शिवाजी, चांदजी, नाईकजी व रायाजी असे पाच पुत्र होते. सरदार कान्होजी जेधे यांनी आपल्या हयातीतच इ.स. 1649 साली आपले वाटणीपत्र करून ठेवले होते. या पाच पुत्रांच्या वाटणीबरोबर आपली ज्येष्ठ सून तुळजावाला घोरपडवाडी हे गाव इनाम दिले होते. या वाटणीपत्रात ज्येष्ठ पुत्र सर्जेरावानी ‘देशमुखी खाऊन, आपल्या भावांबरोबर येक विचारे, येक जिवे असावे. घरातील लेकीबालीस मायेमाहेर करावे’ असे स्पष्ट लिहिलेले आहे.
या वाटणीपत्राचे वैशिष्टय़ किंवा तत्कालीन स्त्र्ााr जीवनावर प्रकाश टाकणारी नोंद म्हणजे, हे वाटणीपत्र केले तेव्हा, सरदार कान्होजी जेधे यांच्या येसूबाई नावाच्या पत्नीला पुत्र नव्हता. म्हणून वाटणीपत्राच्या वेळी, सरदार कान्होजींचा ज्येष्ठ पुत्र सर्जेराव हाच, येसूबाईंचा पुत्र मानून त्याला येसूबाईंच्या मुलाचा वाटा देण्यात आला होता. मात्र त्यासाठी एक अट घातली होती की, पुढे येसूबाईला पुत्र झाला तर सर्जेराव जेधे यांनी आपला हा वाटा तसाच पुढे येसूबाईंच्या पुत्राला द्यावा. आणि खरोखरच पुढे येसूबाईंना पुत्र झाला आणि सर्जेरावांनी आपल्या वाटणीतील हिस्सा, वडिलांच्या सरदार कान्होजींच्या आज्ञेप्रमाणे आपल्या या धाकटय़ा सावत्र भावाला म्हणजे संभाजी कान्होजी जेधे यांना इ.स. 1660 साली सरदार कान्होजीच्या 1649 सालातील वाटणीपत्रानंतर, म्हणजे अकरा वर्षांनंतर दिला होता. मराठे काळातील सरदार जेधे यांच्या वाटणीपत्रांमधून तत्कालीन समाजरचनेचे दर्शन होतेच, शिवाय बहुपत्नित्वाची चाल असली तरी स्त्र्ायांचा मान राखून त्यांच्या चरितार्थाची सोय केलेली दिसते. यामुळे पुढे मराठा राज्य संपल्यावर ब्रिटिशांनी तनखे देतानाही प्रथम पत्नी व सवत अशी वेगवेगळी नावे लिहून या स्त्र्ायांना तनखे दिलेले दिसतात. बहुपत्नित्वाची चाल-रूढ असली तरी आणि काही कौटुंबिक भांडणाचे प्रसंग सोडले तर या स्त्र्ाया लढाया, दुष्काळ, परचक्र अशा संकटांना सामोरे जाऊन एकत्र नांदताना दिसतात.
बाळपरवेशी-नानपरवेशी अशी इनामे धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या आई, पत्नी व मुलांना मराठा राज्यकर्त्यांनी दिलेली दिसतात. याबरोबरच स्वतःच्या हयातीतच आपल्या मृत्यूनंतर मागे राहणाऱया आपल्या घरातील सर्व स्त्र्ायांच्या चरितार्थाची सोय करून त्यांचे जिणे सुसहय़ असावे, असा विचार मराठेकालीन कागदपत्रांमधून समोर येतो.
(लेखिका इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत)
n [email protected]



























































